Last Updated: Saturday, July 28, 2012, 21:20
www.24taas.com, न्यू यॉर्क इंटरनेटच्या युगात जगाला जोडणा-या गुगलने जगातील सर्वाधीक स्पीड आसलेली इंटरनेट सेवा आज सुरु केली. या इंटरनेटचा स्पीड एक गिगाबाईट प्रती सेकंद आहे. ऑप्टिकल फाइबरचा वापर करणारी ही सेवा जगातील सर्वाधिक वेगवान इंटरनेट सेवा आहे.
डेली मेल या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार ‘कान्सास सिटी’त ‘गूगल फाइबर’ या नावाने ही सर्वाधिक इंटरनेट गती आसलेली सेवा सुरु करण्यात आली आहे.भविष्यात गुगल ही सेवा सर्व शहरांत सुरु करणार आसल्याचंही सांगण्यात आलं आहे.
गुगलचे मुख्य वित्त अधिकारी पैट्रिक पिशेते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा लोकापर्यंत पोहचवणं हे गुगलटं पुढचं पाऊल असेल. सन २००० सालापासून ते आत्तापर्यंत इंटरनेटचा स्पीड हे ब्रॉडबँड आधार मानून मोजलं जातं.
First Published: Saturday, July 28, 2012, 21:20