Last Updated: Thursday, August 9, 2012, 20:45
www.24taas.com, मुंबई 
रेल्वेच्या टाईमटेबलला रद्दीत टाकायला लावणारं ‘एम इंडिकेटर’ हे सॉफ्टवेअर आता नवीन स्वरूपात दाखल झाले आहे. मोबाईलमधल्या या सर्वात लोकप्रिय सॉफ्टवेअरमध्ये पिकनिक स्पॉट, नोकरी, विवाहविषयक जाहिराती यांचीही माहिती मिळणार आहे. सचिन टेके या मराठी मुलाने तयार केलेल्या एम इंडिकेटरची ही पाचवी आवृत्ती मुंबईकरांसाठी दिशादर्शक ठरेल.
.रेल्वेच्या तीनही मार्गांचं टाईमटेबल एका क्लिकवर मिळेल असं सॉफ्टवेअर मोबॉण्ड या कंपनीअंतर्गत निर्माण करून सचिन टेके या मुलाने रेल्वेच्या वेळेनुसार दिनक्रम आखणार्या मुंबईकरांचा ट्रेनच्या गर्दीचा प्रवास सोपा केला. रेल्वेच्या टाईमटेबलसोबतच रिक्षा, टॅक्सी यांचे भाडे, मुंबईतील बसमार्ग यांची माहितीही यात आहे. या सॉफ्टवेअरची नवीन आवृत्ती सचिनने कंपनीच्या वेबसाईटवर टाकली आहे.
मुंबईकरांना मोफत मिळणार्या सुविधेत आता आणखी एक वाढ झाली आहे. या तुम्हाला नोकरीविषयक आणि विवाहविषयक जाहिरातीही पाहता येणार आहेत. तसेच जाहिरातीमध्ये दिलेले संपर्क क्रमांक ‘क्लिकेबल’ असल्यामुळे ताबडतोब संपर्कही साधता येणार आहे. ग्राहकांसाठी या जाहिराती मोफत असल्यातरी जाहिरातदारांसाठी याला दर लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता एमइंडिकेटरवरून भावी आयुष्याचीही दिशा मिळेल.
First Published: Thursday, August 9, 2012, 20:45