आकाशची लाखाला गवसणी - Marathi News 24taas.com

आकाशची लाखाला गवसणी

www.24taas.com, नवी दिल्ली
 
जगातील सगळ्यात स्वस्त टॅबलेट आकाशची ऑनलाईन बुकिंग अगदी जोरात सुरू आहे. फक्त १४ दिवसात १४ लाख बुकिंग ही ह्या टॅबलेटसाठी झाली आहे. जेव्हा पासून या टॅबलेटची वेबसाईट सुरू झाली तेव्हापासून हयाच्या बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे  .
 
आकाश टॅबलेटच्या ऑनलाइन वेबसाईट ही  १५ डिसेंबर २०११ पासून सुरू झालेली आहे. या आकाश टॅबलेटची किंमत ही २४९९ रूपये इतकी आहे. तसचं यासोबत या ऑनलाइन बुकिंगचं शिपिंग शुल्क हे १९९ रूपये जादा द्यावा लागणार आहे. पण तुम्हांला हा टॅबलेट कॅश पेमेंट  करून सुद्धा घेता येईल.
 
सात इंच स्क्रिन असणाऱ्या या टॅबलेटचा रॅम २५६ मेगाबाइट आहे. एआरएम ११ प्रोसेसर सोबत एड्रॉयड २.२ ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा मिळेल. दोन यूएसबी पोर्ट आणि एचडी सोबत व्हिडिओची सुद्धा सुविधा मिळणार आहे. आकाशच्या या टॅबलेटची बॅटरीची क्षमता ही जवळजवळ दिड तास आहे.

First Published: Tuesday, January 3, 2012, 21:20


comments powered by Disqus