प्रयोगशाळेत कृत्रिम शुक्रजंतू तयार - Marathi News 24taas.com

प्रयोगशाळेत कृत्रिम शुक्रजंतू तयार

www.24taas.com, लंडन
 
शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच प्रयोगशाळेत उंदराचे शुक्राणु निर्माण करण्यात यश मिळालं आहे. आता शास्त्रज्ञांचा दावा आहे की यातून माणसांचे कृत्रिम शुक्राणु जन्माला घालणं शक्य होऊ शकतं. यामुळे लाखो निपुत्रिक पुरूषांना आपल्या बाळाचे बाप बनणं शक्य होणार आहे.
 
जर्मनीच्या म्युंस्टर विद्यापीठाच्या प्रो. स्टीफन स्कार्लेट यांच्या नेतृत्वाखालील एका आंतरराष्ट्रीय दलाने असा दावा केला आहे की त्यांनी जनन कोशिका वापरून प्रयोगशाळेत उंदरांचे शुक्राणु तयार केले आहेत. या कोशिका अंडकोषात असतात. या कोशिकांतून शुक्राजंतू जन्म घेतात.
 
शास्त्रज्ञांनी शुक्राणु बनवण्यासाठी जनन कोशिका खास बनवून घेतलेल्या ‘अगर जेली’च्या आवरणात ठेवले. यामुळे शुक्राणु उत्पादनासाठी अंडकोषाला आवश्यक असलेलं वातावरण तयार झालं.
 
संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या ग्रुपमधील एक असणारे आणि इस्त्राईलमधील बेन गूरियान युनिव्हर्सिटीचे महमूद हुलेइहेल यांनी म्हटलं की आम्ही एक असा कृत्रिम शुक्राणू तयार केला ज्याचा उपयोग छोटा उंदीर जन्माला घालण्यासाठी होऊ शकतो. हा शुक्राजंतू अतिशय आरोग्यपूर्ण असून याला कुठलाही अनुवंशिक त्रास नाही.
 
 

First Published: Saturday, January 7, 2012, 13:35


comments powered by Disqus