आकाशचे १५ दशलक्ष टॅबच्या विक्रीचे लक्ष्य - Marathi News 24taas.com

आकाशचे १५ दशलक्ष टॅबच्या विक्रीचे लक्ष्य

www.24taas.com, मुंबई 
 
आकाश टॅबलेटची निर्माती डाटाविंड यंदाच्या वर्षात १५ दशलक्ष टॅबची विक्री करण्याची शक्यता आहे. कंपनीला भारत सरकारच्या मनुष्य बळ विकास मंत्रालयाकडून अल्प किंमतीतील टॅबलेटच्या पुरवठ्याची ऑर्डर मिळवली आहे. मंत्रालय यंदाच्या वर्षात विविध कंपन्यांकडून १० दशलक्ष टॅब विकत घेणार आहे. इजिप्त, थायलंड, पनामा, श्रीलंका आणि ब्राझिल या देशातही टॅबची विक्री करण्याची डाटाविंडची योजना आहे. डाटाविंडच्या आकाशा या एण्ड्रोईड टॅबलेटची किंमत फक्त २४९९ रुपये आहे आणि १९९ रुपये पाठवणीचा खर्च आकारला जातो. सध्या आकाशची बॅटरी दीड तास चालु शकते.
आकाशमध्ये सात इंच टच स्क्रीन तसंच २५६ मेगाबाईट रॅम आणि एआरएम ११ प्रोसेसर तसंच एण्ड्रोईड २.२ ऑपरेटिंग सिस्टिम, दोन युएसबी पोर्ट आणि एचडी क्वालिटी व्हिडीओ हे फिचर्स आहेत.

First Published: Friday, January 6, 2012, 21:46


comments powered by Disqus