मारुती सर्वोची नॅनोला टक्कर - Marathi News 24taas.com

मारुती सर्वोची नॅनोला टक्कर

www.24taas.com, नवी दिल्ली
 
 
भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती-सुझुकी सर्वसामान्यांना परवडेल अशी चारचाकी बाजारात आणणार आहे. ही चारचाकी आकाराने लहान असणार आहे. या गाडीची किंमतही एक लाख ५० हजार रूपयांपर्यंत असणार आहे.
 
 
नव्या वर्षात मारूती कंपनी कात टाकण्याच्या तयारीत आहे. स्विफ्ट डिझायरची स्वस्तातील आवृत्ती सादर केल्यानंतर मारुती आता अधिक स्वस्त आणि अधिक छोट्या कारची निर्मिती करण्यात गुंतली आहे. ही छोटी कार यंदाच बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे. टाटाच्या नॅनोला सर्वो चांगली टक्कर देईल, असे  व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.  ही कार भारताच तयार करण्याचा कंपनीचा  निर्धार आहे.
 
 
सर्वो सर्वगुणसंपन्न असावी, याकडे कंपनी लक्ष देत आहे. सर्वोचे इंजिन ६६०  सीसीचे असणार आहे. हे इंजिन ६० बीपी शक्तीचे असून कारचा आकार लक्षात घेता हे शक्तिशाली इंजिन आहे. सर्वो एक लिटरमागे २१ ते २६ किलोमीटर मायलेज देईल.  सर्वोची किंमत एक लाख ५० हजार रूपयांच्या घरात  ठेवण्याची कंपनीची योजना आहे.  २५ सेकंदात ०-१०० किमी अॅव्हरेज असेल. या गाडीचा ताशी वेग ११५ च्या जवळपास असेल. ही गाडी आरामदायी बनविण्यावर भर देण्यात आला आहे.  या गाडीला ०.७L ऑटोमेटीक ट्रान्समिशन  आहे. त्यामुळे गाडी चालवताना सहजता येईल.
 
 

गाडीची वैशिष्ट्ये
सर्वोचा आकर्षक लूक
किंमत - एक लाख ५० हजार रूपयांपर्यंत
इंजिन ६६०  सीसीचे 
एक लिटरमागे २१ ते २६ किलोमीटर मायलेज
आरामदायी शीट
ऑटोमेटीक ट्रान्समिशन
 
 
 
कशी दिसते गाडी.. फोटो पाहा
मारुती-सुझुकीची नवी सर्वो (Cervo)
 

First Published: Saturday, February 4, 2012, 15:28


comments powered by Disqus