(मातृभाषा दिन विशेष) इंटरनेट वाचवणार भाषा - Marathi News 24taas.com

(मातृभाषा दिन विशेष) इंटरनेट वाचवणार भाषा

www.24taas.com, मुंबई
 

आज २१ फेब्रुवारी. हा दिवस  'जागतिक मातृभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.


 
जगभरातल्या अनेक भाषा लुप्त होत असताना त्यांचं अस्तित्व टिकवण्याचं काम इंटरनेट करू शकतो असा दावा भाषातज्ज्ञांनी केला आहे. फेसबुक, ट्विटर यांसरख्या सोशल मीडिया साईट्स आणि इंटरनेट भारतातील मृत होऊ लागलेल्या भाषांचं संवर्धन करण्यास मदत करू शकतात.
 
जगभरात बोलल्या जाणाऱ्या ७००० भाषांपैकी सुमारे ३५०० भाषा या शतकाअखेरीपर्यंत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा लुप्त होऊ पाहाणाऱ्या हजारो प्राचीन भाषांचं संरक्षण करण्यासाठी एका ग्रुपने आठ ‘बोलणाऱ्या डिक्शनरीं’चं अनावरण केलं आहे.
 
‘हो’ मुंडा भाषा आहे. ही ऍस्ट्रोएशियाटिक भाषा कुटुंबातील एक सदस्य आहे. भारतातले ३,८०३,१२६ लोक ही भाषा बोलतात. ही भाषा देवनागरीत लिहीली जाते आणि हिची लिपी वारंग काशिटी आहे. हो लोक ही भाषा बोलतात. या लिपीची स्थापना आणि विकास पंडित डॉ. लाको बोद्रा यांनी केला होता.
 
द टेलिग्राफच्या वृत्तानुसार या डिजीटल डिक्शनरीमध्ये ३२ हजार लिखीत शब्द आहेत तर २४ हजार ऑडियो रेकॉर्डिंग आहे.

First Published: Tuesday, February 21, 2012, 17:05


comments powered by Disqus