Last Updated: Thursday, March 29, 2012, 12:53
www.24taas.com, नवी दिल्ली तुम्हाला ब्लॅकबेरी हँडसेट्स घ्यायचा असेल तर आता ते शक्य होणार आहे. मात्र, थोडावेळ थांबलात तर तुम्हच्या खिशाला ते परवडणारे आहे. कारण कंपनीने सामान्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी २६ टक्क्यांनी किमतीत घट करण्याची योजना आखली आहे.
भारतातत स्मार्टफोन मार्केटमध्ये मुसंडी मारण्यासाठी ब्लॅकबेरीने हँडसेट्सच्या घटवल्या आहेत. केवळ उद्योगजगतातील व्यक्तिंच्या हातात ब्लॅकबेरी हँडसेट्स न राहता सर्वसामान्यांच्या, विशेषत: तरुणांच्या हातात ब्लॅकबेरी दिसावा या उद्देशाने किमतीत घट करण्यात आल्याचे ब्लॅकबेरी ब्रँड असलेल्या रीसर्च इन मोशन (रीम) कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील दत्त यांनी स्पष्ट केले आहे.
ब्लॅकबेरीचे सगळ्यात स्वस्तातले मॉडेल म्हणजे कर्व्ह ८५२० ज्याची किंमत १०,९९० रुपये होती ते आता ८,९९९ रुपयांना मिळणार आहे. तर टॉर्च ९८६० हे मॉडेल २९,९९०च्या ऐवजी २१,९९० रुपयांना मिळणार आहे. कर्व्ह ९३८० (आधीची किंमत २०,९९० रुपये) आणि कर्व्ह ९३६० (आधीची किंमत १९,९९० रुपये) ही मॉडेल्स अनुक्रमे १६,९९० रुपये आणि १८,९९० रुपयांना मिळणार आहेत. ब्लॅकबेरीच्या भारतातील खपामध्ये या चार हँडसेट्सचा वाटा ६० टक्के आहे.
गतवर्षी डिसेंबर महिन्यात ब्लॅकबेरीच्या प्लेबुकची किंमत ३७,९९० रुपयांवरुन थेट २४,४९० रुपये इतकी कमी करण्यात आली होती. ती मार्च महिन्यात पुन्हा कमी करुन १९,९९० रुपये इतकी करण्यात आली. सायबर मीडिया रीसर्चच्या एका अहवालानुसार प्लेबुकमध्ये ब्लॅकबेरीचा भारतातला हिस्सा २१ टक्के आहे.
First Published: Thursday, March 29, 2012, 12:53