Last Updated: Tuesday, April 17, 2012, 17:33
www.24taas.com, नवी दिल्ली फास्ट, सुधारित व्हर्जन असणारा आणि जगातला सगळ्यात स्वस्त मानला जाणारा आकाश टॅब पुढच्या महिन्यात आपल्या हाती येणार आहे. दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी आज अशी घोषणा केली आहे.
जागतिक माहिती तंत्रज्ञान फोरम २०१२मध्ये पत्रकारांशी बोलताना सिब्बल म्हणाले, “आकाशचं दुसरं व्हर्जन मे महिन्यात लाँच करण्यात येईल. एकदा तंत्र लक्षात आलं की या टॅबची निर्मिती सुरू करू. जगभरातील कंपन्यांना निर्मितीसाठी विचारण्यात येत आहे. आणि काही जणांना ‘आकाश’च्या निर्मितीत रस आहे.”
आकाशचं नवं व्हर्जन अधिक चांगलं असेल. याचा प्रोसेसर ७०० मेगावॅट असेल. या टॅबलेटची बॅटरी अथक ३ तास चालू शकेल. असं ‘आकाश’चं अत्याधुनिक व्हर्जन मे महिन्यात जनतेसाठी उपलब्ध होईल.
First Published: Tuesday, April 17, 2012, 17:33