Last Updated: Thursday, April 19, 2012, 18:33
www.24taas.com, नवी दिल्ली ब्लॅकबेरी बनवणाऱ्या रिसर्च इन मोशन (RIM)ने आपला स्मार्टफोन कर्व्ह ९२२० आज लाँच केला. या स्मार्टफोनची किंमत १०,९९० रुपये आहे. भारतीय बाजारात आपली स्थिती अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने स्वस्तात नवा फोन विक्रीस उपलब्ध केला आहे.
कर्व्ह ९२२० ब्लॅकबेरीमध्येही ऍडव्हांस ब्लॅकबेरी ७.१ ऑपरेटिंग सिस्टम आहे. सध्या रिमचं सर्वात जास्त विकलं जाणारं मॉडेल कर्व्ह ८५२० आहे. या मडेलची किंमत ८,९९९ रुपये आहे. रिमने पहिल्यांदाच जागतिक स्तरावर फोन लाँच केला आहे.
‘ब्लॅकबेरी कर्व्ह ९२२० तरूणांना नक्कीच आवडेल. आंतरराष्ट्रीय बाजारात स्मार्टफोनच्या तुलनेत रिमची पार्टनरशीप फारशी चमक दाखवू शकली नसली तरी भारतात मात्र व्यापार वाढण्याची शक्यता जास्त आहे.’ अशी आशा रिमचे संचालक सुनिल दत्त यांनी व्यक्त केली आहे.
First Published: Thursday, April 19, 2012, 18:33