Last Updated: Tuesday, September 27, 2011, 12:46
झी २४ तास वेब टीम, लंडन. 21 व्या शतकात माहिती आणि तंत्रज्ञान यांनी केलेली क्रांती ही सगळ्यांनाच फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे इंटरनेटची. समुद्राचा तळाशी असणाऱ्या इंटरनेट केबल वायरचे जाळे संपूर्ण जगभर पसरले आहे. याच केबल वायरच्या माध्यमातून जगभरातील 99 टक्के इंटरनेट हे कार्यरत आहेत. याच समुद्राच्या तळाशी असणाऱ्या केबल वायरचे रेखाचित्र हे ग्लोबल बँडविड्थ रिसर्च सर्व्हिस यांनी प्रसिद्ध केले आहे.

टेलीजियोग्राफी तंत्रज्ञानाद्वारे समुद्रात पसरलेल्या केबल वायरचे जाळे लक्षावधी डॉलर खर्च करून तयार केलेल्या या नेटवर्कचे मानचित्र पाहण्यास मदत होईल. रेखाचित्र बनवणाऱ्या टीमचा मते समुद्राखाली पसरलेल्या केबल वायर या अत्यंत महागड्या असतात. यांची किमंत जवळ जवळ 10-15 करोड डॉलरचा घरात आहे. मागील वर्षी एका जहाजामुळे समुद्राखाली असणारी केबल वायर कापली गेली, त्यामुळे युरोप ते पश्चिम आशियापर्यंत संपूर्णं इंटरनेट प्रसारण हे पूर्णत: ठप्प झालं होतं. तसंच हिंद महासागरामध्ये सुध्दा एका जहाजाने अशाच प्रकारे केबल वायर कापली होती. त्यामुळेच या रेखाचित्रामुळे केबलची जागा आणि लांबी समजण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल.
तसंच या वायर तुटल्यास त्यांचा दुरूस्ती खर्च हा सुद्धा अफाट असतो. सुमारे 10 हजार डॉलरपेक्षा जास्त हा खर्च असण्याची शक्यता असते. केबल तुटल्यास त्यांचा दुरूस्तीसाठी एका जहाजाला पाठविले जाते, त्याचा खर्च देखील जास्त असतो. केबल ही जास्त रूंद नसते. जसं की घरात वापरण्यात येणाऱ्या एखाद्या जाड दोरी इतकीच ही केबल वायर असते. इलेक्ट्रिक लाइन, फाइबर लाइनला समांतरच या केबल वायर टाकल्या जातात.
केबल वायर तुटल्यास त्यापासून निर्माण होणारी आपत्ती विचार करावयाचा झाल्यास असे दिसून येते की, २००८ मध्ये सिसली (इटली) ते इजिप्तमधील केबल तुटल्याने भारतातील ५० टक्के कॉम्प्युटर मार्केट आणि शेअर बाजार बंद पडला होता.
First Published: Tuesday, September 27, 2011, 12:46