मारुतीची नवी हटके छोटी कार...कशी आहे ही कार?, The new car will hit Maruti at the Auto Expo

मारुतीची नवी हटके छोटी कार...कशी आहे ही कार?

मारुतीची नवी हटके छोटी कार...कशी आहे ही कार?
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

देशातील आघाडीची कार बनवणारी कंपनी मारूतीने मार्केटमध्ये नवी छोटी कार आणली आहे. त्यामुळे बाजारात ही मारूतीची ही नवी कार धमाका उडवेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मारूती-सुझकीची नवी छोटी कार नुकत्याच ऑटो एक्सपो कार प्रदर्शनात दाखविण्यात आली. त्यामुळे ही हटके कार सर्वांना पसंत पडली आहे. ही कार मारूतीच्या दोन छोट्या गाड्यांची जागा घेईल. या कारला सुझुकी सेलेरियो असे नाव देण्यात आले आहे. फिलिपाईन्समध्ये ए-स्टार असं नाव दिले आहे. मात्र, भारतात ही कार झेन एस्टिलो आणि ए-स्टार या गाड्यांची जागा घेईल. २०१३मध्ये ही कार थायलंडमध्ये एका मोटर शोमध्ये उतरविण्यात आली होती. त्याठिकाणी सुझुकी विंड कॉन्सेप्टचे नाव देण्यात आले होते.

याच कारचे नवीन रूप दिल्लीतील ऑटो एक्सपो या प्रदर्शनात ठेवण्यात आले. मारुती सेलेरियोमध्ये मारुतीच्या के-सीरीज इंजिनाचा वापर करण्यात येणार आहे. या कारची इंजिन क्षमता एक हजार सीसी असेल. ही कार जास्त आव्हरेज देईल. ही कार डिझेलवर असण्याची शक्यता कमी आहे.

ही कार भारतात आल्टो आणि आल्टो के १० बरोबर विक्री कऱण्यात येईल. त्याचवेळी परदेशात या दोन्ही गाड्यांचे उत्पादन थांबविण्यात येणार आहे. सध्या या कारला वायएल-७ असे नाव देण्यात आले होते. आता ही कार आपल्या नव्या नावाने ओळखली जाईल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात येणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 4, 2014, 13:17


comments powered by Disqus