Last Updated: Tuesday, February 11, 2014, 21:00
www.24taas.com, झी मीडिया, मिलानएका तासात कार बनवून ती तुम्ही रस्त्यावर चालवू शकतात का... हे स्वप्न नाही आता हे प्रत्यक्षात तुम्हांला करता येणार आहे. आता तुमच्यासाठी एक अशी कार आली आहे. की ती तुम्ही केवळ साठ मिनिटांमध्ये असेंबल करून रस्त्यावर पळवू शकतात.
मेल ऑनलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार या कारची निर्मिती चीनच्या एका व्यापाऱ्याने आणि इटलीच्या एका डिझायनरने तयार केली आहे. ओएस व्हेइकल प्रोजक्टचे संस्थापक एम्पोलियो मैशी यांनी सांगितले की, या कारचे नाव अर्बन टॅबी कार असून त्या कारला साठ मिनिटांमध्ये असेंब्ल करता येणार आहे.
या कारमध्ये दोन ते चार लोक प्रवास करू शकतात. या कारमध्ये इलेक्ट्रीक आणि हायब्रीड इंजन असणार आहे. ही कार सहज ८५ किलोमीटर प्रति ताशीच्या स्पीडने धावू शकते. या कारला असेंब्ल करण्यासाठी कोणत्याही विशेष टूल्सची गरज नाही. या कारला सहजतेने आपल्या सोबत आपण नेऊ शकतो. ही कार दोन आणि चार आसनीमध्ये आहे.
ही कार तुमच्याकडे स्पेअर पार्टच्या स्वरूपात येते. ६००० युरो अशी याची किंमत आहे. या कारची रेंज ४ हजार युरोपासून ६ हजार युरोच्या मध्ये आहे. या कारची चॅसी तुम्ही तुमच्या पद्धतीने बदलू शकतात.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 11, 2014, 21:00