वॉट्स अॅपच्या व्यसनानं होऊ शकतो `वॉट्सअॅपिटिस`!Whats app addiction may be create `whatsapitis`

वॉट्स अॅपच्या व्यसनानं होऊ शकतो `वॉट्सअॅपिटिस`!

वॉट्स अॅपच्या व्यसनानं होऊ शकतो `वॉट्सअॅपिटिस`!
www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन

सध्या वॉट्स अॅपचा जमाना आहे. मात्र तर वॉट्स अॅपवर खूप मॅसेजेस केल्यानंतर तुमचं मनगट दुखत असेल तर लक्षात घ्या तुम्हाला वॉट्सअॅपिटिस झालाय.

ब्रिटीश मेडिकल जर्नल `द लँसेट` समोर वॉट्सअॅपिटिसची पहिली ऑफिशिअल केस समोर आलीय. स्पेनमधील एका गरोदर महिलेनं खूप वेळेपर्यंत वॉट्स अॅपचा वापर केल्यानं तिचं मनगट खूप दुखायला लागलं.

या महिलेनं सतत ६ तास वॉट्स अॅपचा वापर केला होता. ज्यामुळं तिला मनगटाचं दु:ख सहन करावं लागलं. त्यानंतर पेशंटला म्हणजेच त्या महिलेला वॉट्सअॅपिटिसपासून मुक्त होण्यासाठी त्याचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आलाय.
त्यामुळं जर खूप वेळ वॉट्स अॅपचा वापर केला आणि तुमचा हात, मनगटात दु:ख असलं तर तुम्ही पण त्यापासून दूर राहा असा सल्ला पीडित महिलेनं दिलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 9, 2014, 17:50


comments powered by Disqus