`आकाश` जमिनीवर कधी उतरणार?- मोदी When can we touch the `Akash`?- modi

`आकाश` जमिनीवर कधी उतरणार?- मोदी

`आकाश` जमिनीवर कधी उतरणार?- मोदी

www.24taas.com, गांधीनगर

‘गुजरातमध्ये सत्ता मिळाल्यास विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वाटू’ असं अश्वासन देणाऱ्या काँग्रेसचा समाचार घेताना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी विचारलं, “एवढा गाजावाजा होत असलेलं ‘आकाश’ टॅबलेट जमिनीवर कधी उतरणार? ”

शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी म्हणाले, लॅपटॉप देण्याचं अश्वासन देणारी काँग्रेस यापूर्वीची अश्वासनं कधी पूर्ण करणार? जगातील सर्वांत स्वस्त असणारं आकाश टॅबलेट काँग्रेस भारतात आणणार होती. यामध्ये काँग्रेसला अपयश आलंय. केंद्राने अशी अनेक अश्वासनं दिली, पण त्यातली अनेक अश्वासनं पूर्ण झालीच

मोदी म्हणाले, “विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, की काँग्रेसचे दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी ११ महिन्यांपूर्वी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात एका मोठ्या समारंभात मीडियासमोर आकाश टॅबलेट देशासमोर सादर केला होता. त्याचं काय झालं?”

मोदी म्हणाले, “लक्षात घ्या, जगातला सर्वात स्वस्त पीसी विद्यार्थ्यांना ३००० रुपयांमध्ये मिळणार आहे. फुकटात नाही. ११ महिने होऊनही हा टॅबलेट पीसी बाजारात आला नाही, तेव्हा मला समजलं, या पीसीचं नाव ‘आकाश’ असं का ठेवलं. जर हे आकाश टॅबलेट जमिनीवर उतरलं असतं, तर त्यांच्या खोट्या दाव्यांना लोक भुलले असते.” मोदींनी आकाश टॅबलेटचा प्रश्न ऐरणीवर आणून पुन्हा काँग्रेसला अडचणीत आणलं आहे.

First Published: Thursday, September 6, 2012, 11:32


comments powered by Disqus