कोकणाक येताय, आरामात या!!!, 100 extra buses from mumbai to konkan

कोकणचं आरक्षण फुल्ल... नो टेन्शन!

कोकणचं आरक्षण फुल्ल... नो टेन्शन!
www.24taas.com, मुंबई

काही लहानग्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यात तर काहींच्या होण्याच्या मार्गावर आहेत. साहजिकच सुट्ट्या लागल्यानंतर पहिला बेत तयार असतो तो गावच्या फेरफटक्याचा... गेल्या कित्येक वर्षांच्या अनुभावानं आता एसटी यासाठी तयार झालीय.

एसटी महामंडळानं मुंबई आणि ठाण्यातून कोकणातील प्रवाशांना खुश करणारी बातमी दिलीय. यंदा १० एप्रिल ते ३० जून यादरम्यान दररोज १०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलाय. त्यात मुंबई सेंट्रलसह परळ, कुर्ला, बोरीवली, ठाण्यासह मुंबई आणि परिसरातील सर्व डेपोंमधून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत.

अन्य भागांसाठी एसटीनं याआधीच ५७२ ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलेला होता. या बस सेवेचं आरक्षणासाठी केंद्रांवर आणि www.msrtc.gov.in बेबसाईटवर ऑनलाईन आरक्षण उपलब्ध करण्यात आलंय.

जादा गाड्या

मुंबई सेंट्रलः सावंतवाडी, मालवण, कर्दे, गुहागर, पांगारी, संगमेश्वर, रत्नागिरी, सैतवडे, लांजा, मंडणगड, बुरंबेवाडी, दापोली, वेळास, पणजी

परळः आडे - आंजर्ला, विन्हे, आरोंदा - वेंगुर्ले, कुडाळ, कणकवली - फोंडा, दापोली, गुहागर, हर्चे, डौली

कुर्ला नेहरूनगरः देवगड

बोरीवलीः सावंतवाडी, आरोंदा - वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड, विजयदुर्ग, दापोली, खेड, चिपळूण, तोंडली, विर, दुर्गेवाडी, गुहागर, पाभरे, करजुवे, ओझरे, कोतापूर, जयगड, रत्नागिरी, झर्ये, लांजा, इसवली, पाचल, तारळ, राजापूर, मंडणगड, विरसई, पणदेरी, कात्रोळी

ठाणेः दापोली, खेड, चिपळूण, सातेरे, महाड

कल्याणः दापोली

भांडुपः खेड, गुहागर, चिपळूण

भाईंदरः दापोली, मंडणगड, महाड

पनवेलः अलिबाग - मुरुड, पोलादपूर

उरणः भातगाव - गणपतीपुळे

वसईः रत्नागिरी

अर्नाळाः सावंतवाडी

नालासोपाराः दापोली, साखरपा, खेड, राजापूर, केळशी

विरारः पिंपळोली, बोऱ्या, पणदेरी, कात्रोळी, गुहागर, चिपळूण

First Published: Thursday, April 11, 2013, 16:18


comments powered by Disqus