Last Updated: Saturday, December 22, 2012, 12:09
www.24taas.com, ठाणे ठाण्यातल्या विटावा भागात महिलेची हत्या करण्यात आली आहे. या २१ वर्षीय महिलेचं नाव गायत्री लोहार असं आहे... वर्षभरापूर्वी संपत नावाच्या व्यक्तीशी लग्न झालं होतं..
शुक्रवारी सकाळी ती घरी एकटी असताना अज्ञात इसमानं तिची गळा दाबून हत्या केली. संपत हा सुतार काम करतो.. तो कामावरुन घरी परतल्यावर गायत्रीची हत्या झाल्याचं उघड झालं..
महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दिल्लीतील गँगरेप प्रकरणाने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेविषयी सरकार नक्की काय पावलं उचलणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
First Published: Saturday, December 22, 2012, 11:58