Last Updated: Tuesday, August 14, 2012, 10:51
www.24taas.com, नवी मुंबईवीजेच्या कनेक्शनसाठी लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागानं नवीमुंबईत अटक केली आहे.
परवानाधारक कंत्राटदारानं वीज कनेक्शनसाठी २०११मध्ये महावितरणचा कनिष्ठ अभियंता अविनाश कोकितकर यांच्याकडं अर्ज केला होता. त्यावेळी त्यानं कंत्राटदाराकडून १लाखाची मागणी केली. याबाबत कंत्राटदारानं अधिका-याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
मात्र त्यानंतर तेच काम करण्यासाठी आता पुन्हा एकदा या अधिका-यानं कंत्राटदाराकडं चार लाखाची मागणी केली. पेसे मागितल्याने मात्र कंत्राटदारानं नवी मुंबई लाचलुचपत विभागात तक्रार केली त्यानुसार सापळा रचून दोन लाख रुपयांची लाच घेताना कोकीतकर याला रंगे हाथ पकडले.
First Published: Tuesday, August 14, 2012, 10:51