अहमदनगरमध्ये भीक मागो आंदोलन, अधिकाऱ्याला दिली लाच

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 14:28

महिला व बालविकास विभागात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ भीक मागो आंदोनल करण्यात आलंय. संपूर्ण शहरात प्रभात फेरी काढून भीक मागण्यात आली आणि ती भीक महिला व बालकल्याण विभागातील अधिका-यांना लाच म्हणून देण्यात आली.

शिर्डी प्रांताधिकारी कार्यालयात लाच घेताना कारकून अटकेत

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 09:12

शिर्डी प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून सुनील फाफाळे यास १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागान रंगेहाथ अटक केली.

`काश्मीरमधील शांततेसाठी लष्कर देतं मंत्र्यांना लाच!`

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 19:56

जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी, स्वातंत्र्य मिळाल्यापासून लष्कराकडून काही मंत्र्यांना पैसे दिले जात असल्याचा गौप्यस्फोट माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय...

नाशिक लाचखोरीचा तपास थंडावला

Last Updated: Monday, May 13, 2013, 11:20

नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अधिकाऱ्यांनी तपासात अप्रत्यक्ष असहकार पुकारल्यानं एसीबीचा तपास थंडावलाय.

पवनकुमार बन्सल यांच्यापाठोपाठ अश्विनीकुमारांचाही राजीनामा

Last Updated: Friday, May 10, 2013, 22:07

रेल्वेतील लाचखोरी प्रकरण पवनकुमार बन्सल यांना चांगलंच भोवलंय. पंतप्रधानांची भेट घेऊन बन्सल यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा सादर केलाय.

स्वाती चिखलीकरच्या लॉकर्समध्ये ९ किलो सोनं

Last Updated: Thursday, May 9, 2013, 19:12

नाशिममधील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता यांच्याकडे कोट्यवधीची बेहिशोबी संपत्ता सापडली. अभियंता सतीश चिखलीकर आणि वाघ यांना अटक करण्यात आलेय. स्वाती चिखलीकर हिच्या नगर जिल्ह्यातल्या बँक लॉकर्समध्ये अंदाजे सव्वातीन कोटींची मालमत्ता सापडलीये.

महेशकुमारच्या अड्ड्यातून करोडोंची बेनामी संपत्ती जप्त

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 08:32

रेल्वेत पदोन्नती मिळावी यासाठी ९० लाख रुपये लाच देणाऱ्या पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेश कुमार प्रकरणात सीबीआयनं पुन्हा एकदा धाड सत्र सुरु केलंय.

रेल्वे लाचप्रकरणी आणखी एकाला अटक

Last Updated: Sunday, May 5, 2013, 09:06

सीबीआयने रेल्वे लाचप्रकरणी आणखी एकाला अटक केली आहे. रेल्वेलाचप्रकरणी आतापर्यंत सात लोकांना अटक करण्यात आली आहे.

लाचखोर ३६ मुंबई पोलीस निलंबित, आयुक्तांचा अजब दावा

Last Updated: Thursday, April 11, 2013, 12:43

कुर्ला-नेहरूनगरच्या पोलीस लाचखोरी प्रकरणी आयुक्त सत्यपाल सिंग यांनी अजब तर्क लढवलाय. पोलिसांना लाच घेण्यास प्रवृत्त केल्याचं सिंग यांचं म्हणणं आहे. दरम्यान, लाचखोर ३६ मुंबई पोलिसांना निलंबित करण्यात आलंय.

जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

Last Updated: Thursday, February 21, 2013, 18:24

अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी कॅफो रत्नराज यांना पाच हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं आज ही कारवाई केली.

भ्रष्टाचारापुढे लादेननेही टेकले होते हात

Last Updated: Thursday, December 27, 2012, 17:32

जगभरात दहशत पसरवणारा अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानात लाच देऊन काम करावं लागल्याचं त्याच्या रोजनिशीतून समोर आलं आहे. भ्रष्टाचारासमोर दहशतवादालाही हात टेकावे लागलं असल्याचं हे एक उदाहरण मानता येईल.

पुण्यात उपजिल्हाध्यक्ष लाच घेताना अटक

Last Updated: Thursday, September 13, 2012, 22:16

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी किरण बापू महाजन यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता सापडली आहे. 24 लाख 24 हजारांची रोख रक्कम, 1 कोटी 79 लाख रुपये किंमतीचं सोने, स्थावर मालमत्ता आणि इतर मालमत्ता सापडली आहे.

महावितरण अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 10:51

वीजेच्या कनेक्शनसाठी लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागानं नवीमुंबईत अटक केली आहे.

दुष्काळी भागात पाण्यासाठीही लाच!

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 23:24

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावात टॅंकर लावण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या आटपाडीच्या महसूल विभागातील कारकून आणि तलाठयाला अटक करण्यात आलीय.

नाशकात लाचखोर सहनिबंधकाला अटक

Last Updated: Saturday, May 26, 2012, 18:29

नाशिकमध्ये एका उच्चपदस्थ अधिका-याला आज अटक करण्यात आली. एस.के. शेडपुरे असं या अधिका-याचं नाव आहे. सहकार विभागातील सहनिबंधक पदावर असलेल्या या अधिका-याला ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी ही कारवाई केली आहे.

लाच पडली महाग, बंगारु ४ वर्ष तुरूंगात

Last Updated: Saturday, April 28, 2012, 15:51

लाचखोरी प्रकणात दोषी आढळलेल्या भाजपचे माजी अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना टार वर्षांचा तुरूंगवास आणि एक लाख रूपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. बंगारु यांना काल सीबीआयच्या विशेष कोर्टात बंगारू यांना दोषी ठरविले होते.

आणखी एक पोलीस लाच घेताना अटक

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 05:46

सांगलीत जिल्हा अधिकारी कार्यालयातल्या लाचखोर विशेष कार्यकारी दंडाधिकारी भूपाल कांबळेला ४०० रुपये लाच घेतल्याप्रकरणी चार वर्षांची सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्य़ात आलीय.