नवी मुंबईत तलावात बुडून ३ मुलांचा मृत्यू, 3 children die of Navi Mumbai in tank to be lost

नवी मुंबईत तलावात बुडून ३ मुलांचा मृत्यू

नवी मुंबईत तलावात बुडून ३ मुलांचा मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई

नवी मुंबईत तलावात बुडून ३ मुलांचा मृत्यू झालाय. कोपरखैरणे सेक्टर १९ मध्ये ही घटना घडलीये. तलावात बुडालेली तीनही मुले १० ते १२ वर्ष वयोगटातील आहेत.

कोपरखैरणे येथील सेक्टर १९ मधील तलावात शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता पोहण्यास गेलेली तीन मुले बुडाल्याची घटना घडली. रात्री उशिरा एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत अन्य दोघांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करीत होते. त्यानंतर अन्य़ दोघांचे मृत बाहेर काढण्यात आलेत. ओमकार हिलने, अक्षय भोर, आदित्य गुप्ता अशी त्यांची नावं आहेत.

ही तीनही मुले सायंकाळी या तलावात पोहोण्यास गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तीघेही बुडाले. अग्निशमन दलाने रात्री ११ च्या दरम्यान आदित्य गुप्ता या मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 14, 2014, 07:49


comments powered by Disqus