Last Updated: Friday, June 21, 2013, 16:52
www.24taas.com, झी मीडिया, रायगडकिल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार होणारा 340वा शिवराज्याभीषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जोरदार वा-यापावसाची तमा न बाळगता हजारो शिवप्रेमी किल्ले रायगडावर पारंपारिक वेशभुषेत हजर होते.
राजदरबार, शेळीचा माळ, मेघडंबरी, यांना फुलाची आकर्शक सजावट केली होती. शिवरायांच्या चांदीच्या मुर्तीवर दुध, पंचामृत आणि पाच नद्यांच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला.. त्यानंतर 340 सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांनी रायगडावरील संपूर्ण वातावरण आनंदमय झालं.
कोकणकडा मित्रमंडळ रायगड आणि जिल्हापरिषद रायगड यांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं... यात स्थानिक आमदारांसह अनेक मान्यवरही उपस्थित होते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, June 21, 2013, 16:26