Last Updated: Saturday, September 14, 2013, 21:33
www.24taas.com, झी मीडिया, बदलापूरमुंबईत महिला सुरक्षित नाहीत हे आधी अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झालंय. मात्र अगदी चार वर्षांच्या चिमुरड्याही सेफ नाहीत हे आता सिद्ध झालंय. बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना घडलीय.
सिनीयर केजीमध्ये शिकणा-या चिमुरडीवर बसच्या क्लिनरनच बलात्कार केल्याचं स्पष्ट झालंय. क्लिनरचं नाव संदीप केरवे असून पोलिसांनी त्याला अटक केलीय. ६ तारखेला ही मुलगी स्कूल बसमध्ये बसली असतांना जादू दाखवतो या बहाण्याने मागच्या सीटवर नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
त्यानंतर मुलीनं ही घटना शाळेतील शिक्षकांना सांगितली. त्यानंतर शिक्षकांनी क्लीनरला खडसावून असे प्रकार पुन्हा होता कामा नये, असं बजावून सांगितलं. त्यानंतर ४-५ दिवसानंतर मुलीला त्रास होऊ लागल्यानं मुलीनं आईला हा प्रकार सांगितला.
त्यानंतर घरच्यांनी बदलापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून क्लीनर संदीप केरवे याला अटक केली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, September 14, 2013, 20:52