Last Updated: Thursday, March 28, 2013, 18:17
www.24taas.com, भिवंडीभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत ५८ जागा भरण्यात येणार आहे. वेगवेगळ्या पदासाठी भिवंडी महापालिकेत जागा भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दि. २६ मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
पहा कोणकोणत्या जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत इलेक्ट्रिक इंजिनिअर (1 जागा), परिचारिका (7 जागा), आरोग्य परिचारिका (1 जागा), सब स्टेशन ऑफिसर (1 जागा), फिल्टर अटेडंट (1 जागा), मेस्त्री (1 जागा), बालवाडी शिक्षिका-मराठी (1 जागा), बालवाडी शिक्षिका-उर्दू (३ जागा), गवंडी (1 जागा), फायरमन-प्रकल्पग्रस्त (1 जागा), लिपिक/चेकर नाकेदार/टायपिस्ट/वॉचरुम ऑपरेटर (8 जागा), लिपिक-महिला (5 जागा), लिपिक/चेकर नाकेदार/टायपिस्ट/वॉचरुम ऑपरेटर -भूकंपग्रस्त (1 जागा), वाहनचालक/ड्रायव्हर ऑपरेटर (२ जागा)
वाहनचालक/ड्रायव्हर ऑपरेटर-प्रकल्पग्रस्त (1 जागा), वायरमन (2 जागा), मिडवाईफ (1 जागा), हमाल/शिपाई-महिला (1 जागा), बालवाडी मदतनीस (2 जागा), वॉचमन/चौकीदार (4 जागा), क्लिनर (1 जागा), व्हॉल्वमन (1 जागा), रोड कामगार (3 जागा), रोडकामगार-महिला (1 जागा), वॉटरवर्क्स कामगार (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
First Published: Thursday, March 28, 2013, 18:01