कल्याणमध्ये ४ घरांवर दरड कोसळली, ७ जखमी, 7 injured in crash In Kalyan

कल्याणमध्ये ४ घरांवर दरड कोसळली, ७ जखमी

कल्याणमध्ये ४ घरांवर दरड कोसळली, ७ जखमी
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

कल्याण पूर्वेला असलेल्या नेतीवली परिसरातील चार घरांवर दरड कोसळल्याने प्रचंड खबराट पसरली. दरडीमुळे चारही घरं पूर्ण उध्वस्त झालीत. या दुर्घटनेत ७ जण जखमी झालेत.

सात जण जखमींपैकी एक महिला गंभीर जखमी आहे. संध्याकाळी जयभवानी नगरमधल्या घरांवर ही दरड कोसळली. सात जखमींपैकी उषा देवी ही महिला गंभीर जखमी झालीय. तिला सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय.

घटना घडून गेल्यावर तीन तास उलटून गेल्यावरही इथे अग्निशमन यंत्रणा किंवा पोलीस आले नव्हते यामुळे संताप व्यक्त केला जात होता.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 6, 2014, 09:12


comments powered by Disqus