Last Updated: Wednesday, January 29, 2014, 09:46
24taas.com, झी मीडिया, पालघर मुंबई-अहमदाबाद हायवेवर झालेल्या विचित्र अपघातात आठ जण ठार तर १० जण जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
लक्झरी बस आणि टँकरमध्ये हा भीषण अपघात झाला. पुण्याहून अहमदाबादकडे निघालेल्या पर्पल ट्रॅव्हलच्या लक्झरी बसने एका ऑईल टँकरला पाठून धडक दिल्याने दोन्ही वाहनांनी पेट घेतला. याच दरम्यान बसच्या पाठीमागे असलेल्या कारलाही आग लागली. या आगीत तीनही वाहने जळून खाक झाली.
अपघातग्रस्त बसमध्ये एकूण ३६ प्रवासी होते. पालघर तालुक्यातील कुडे गावाजवळ रात्री दिडच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातामुळे दोन्ही बाजूची वहातूक ठप्प झाली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 29, 2014, 09:44