रिक्षाचालकाने केला प्रवाशाचा खून! Autorickshaw driver kills passenger

रिक्षाचालकाने केला प्रवाशाचा खून!

रिक्षाचालकाने केला प्रवाशाचा खून!
www.24taas.com, झी मीडिया, अंबरनाथ

रिक्षाचालकांच्या मुजोरीचं एक भयावह उदाहरण अंबरनाथमध्ये घडलं. ‘रिक्षाचं भाडं इतकं जास्त कसं झालं’, अशा प्रश्न विचारणाऱ्या प्रवाशाचा रिक्षाचालकानं खून केलाय.

बुधवारी मध्यरात्री एक वाजता बापू तळवलकर हा अंबरनाथला राहणारा प्रवासी बदलापूरहून अंबरनाथला जात होता. अंबरनाथला आल्यानंतर रिक्षाचालकांनी बापू तळवलकरकडे ३०० रुपये भाडे मागितलं. एवढे पैसे कसे झाले असं बापूनं विचारल्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली.

त्यानंतर रिक्षाचालक जसवंत यानं त्याच्या साथीदारांना बोलावून घेतलं. त्यासगळ्यांनी सळई आणि हॉकी स्टिकनं बापूला जबरदस्त मारहाण केली. त्यात प्रवाशाचा मृत्यू झाला. घटनेनंतर रिक्षाचालक फरार झालाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, May 23, 2013, 20:05


comments powered by Disqus