Last Updated: Tuesday, February 11, 2014, 10:17
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झालेल्या धडकेत ३५ जण जखमी झालेत. त्यामधील १६ जण गंभीर आहेत. सकाळी पावणे पाचला हा अपघात झालाय.
रत्नागिरीकडून मुंबईकडे माल घेऊन जाणारा आणि वेरळ ते अंबडस असा भजनाचा ट्रक जात होता. भोस्ते घाटात दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात भजनकरी मंडळी जखमी झालेत. यामध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे.
वेरळ ते अंबडसमधील लोकांना प्राथमिक उपचारासाठी कळंबोली येथील रूग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर डेरवण येथे उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Tuesday, February 11, 2014, 10:02