Last Updated: Tuesday, November 20, 2012, 23:15
www.24taas.com, विरार विरारमध्ये बेकायदा सिलेंडर भरताना झालेल्या स्फोटात चार जण ठार तर १७ जण जखमी झाले आहे. जखमींना विरारच्या संजीवन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विरार स्टेशन जवळ असलेल्या श्रेया हॉटेलच्या मागे असलेल्या प्रिन्स इमारतीत ही घटना घडली. दिलीप जैन यांचे यांचा स्टीलचा कारखाना होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बेकायदा मोठ्या सिलेंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरला जातो. त्यामुळेच हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
स्फोटामध्ये मंजूनाथ, गोविंद आणि मंजू असे तीघा मृतांची नावे असून एका व्यक्तीची अद्याप ओळख पटू शकली नाही.
First Published: Tuesday, November 20, 2012, 23:08