Last Updated: Wednesday, January 30, 2013, 22:54
www.24taas.com, ठाणेडोंबिवली आणि ठाणेकरांसाठी गूड न्यूज आहे. डोंबिवली पश्चिमेतल्या खाडी किना-याहून ठाण्यात जाणा-या माणकोलीला जोडणा-या 200 कोटींच्या प्रकल्पाला मंजूर मिळाली आहे.
डोंबिवलीहून ठाण्याला जाण्यासाठी सध्या सव्वातास लागतात. या प्रकल्पामुळे हा रस्ता केवळ 20 मिनिटांत पार करता येणार आहे. तसेच या पुलामुळे नाशिकमध्ये जाण्यासाठी डोंबिवलीकरांना थेट भिवंडी बाय पासला जाता येणार आहे. हा पूल ३.८ किलो मीटर लांब व ४५ फुट रुंद आहे. एमएमआरडीएचे अधिकारी व खासदार आनंद परांजपे यांनी डोंबिवलीत दौरा करून पाहणी केली.
विशेष म्हणजे खाडी मध्ये पुलासाठी एकही खांब उभारण्यात येणार नसल्याने भविष्यात जल वाहतूकीसाठी अडचण येणार नाही.
First Published: Wednesday, January 30, 2013, 22:54