Last Updated: Thursday, January 31, 2013, 19:41
www.24taas.com, डोंबिवलीडोंबिवली - ठाणे खाडी पुलाला कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचं एमएमआरडीएनं स्पष्ट केलं आहे. या प्रकल्पाबाबत केवळ चर्चा सुरू असल्याचं एमएमआरडीनं म्हटलंय.
याबाबत काल खासदार आनंद परांजपे यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. डोंबिवली पश्चिमेतल्या खाडी किना-याहून ठाण्यात जाणा-या माणकोलीला जोडणा-या 200 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची माहिती काल आनंद परांजपेंनी दिली होती.
एवढंच नव्हे तर खाडीमध्ये पुलासाठी एकही खांब उभारण्यात येणार नसल्यानं भविष्यात जल वाहतुकीसाठीही अडचण येणार नसल्याचंही परांजपेंकडून सांगण्यात आलं होते.
First Published: Thursday, January 31, 2013, 19:41