Last Updated: Thursday, January 31, 2013, 18:11
www.24taas.com, रायगडमुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना, बिल्डरांचं लक्ष आता रायगडकडे लागलं आहे. रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी उपलब्ध आहेत, आणि त्यांना भावही चांगला मिळू शकतो, हे लक्षात येताच बिल्डरांनी ‘रायगडा’वर स्वारी करण्यास सुरूवात केली आहे.
मुंबईत घरांची मागणी जास्त आहे, त्यामुळे प्रस्तावित न्हावाशेवा-शिवडी या समुद्र सेतूजवळ रायगड परिसरात 10 एफएसआय मिळावा, अशी मागणी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेनं केलीय. न्हावाशेवाजवळच नवीन विमानतळ होतंय, तसच रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे. तेव्हा या भागात 10 एफएसआयसह बिल्डिंग उभारण्यास परवानगी मिळाल्यास, मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध होतील, अशी शक्यता आहे.
यामुळे मुंबईतील घरांच्या किमती कमी होतील, असा अजब दावाही बिल्डर संघटनेनं केलाय. न्हावाशेवा सेतूमुळे मुंबई आणि रायगड यामधील अंतर 25 मिनिटांवर येणार आहे.
First Published: Thursday, January 31, 2013, 18:11