Last Updated: Saturday, December 21, 2013, 23:21
www.24taas.com, वृत्तसंस्था, सावंतवाडीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील मळगाव येथे झालेल्या भीषण कार अपघातात पाच जण ठार झाले. कारचा टायर फुटल्याने ती दरीत कोसळली. या अपघातात बालकांसह पाच जण ठार झालेत. तर दोघे जखमी झालेत.
गुजरातमधील सुरत येथील नारकर आणि पोल कुटुंब पर्यटनासाठी गोव्याला गेले होते. गोव्यावरून गुजरातकडे परतत असताना मुंबई-गोवा महामार्गावरील गारापपत्रादेवी पर्यायी महामार्गावर हा अपघात झाला. कार जीजे २६ ए २५५० ही गाडी दरीत कोसळली.
अपघातात जयेशभाई नारकर (४१), गणगौरीबेन नारकर (४०), रोहन नारकर (२१), सपना पोल (३०), मंथन पोल ( ७) या पाच जणांचा मृत्यू झाला. जयनीश नारकर (१६) , मुकुंद पोल (३५) हे दोघे जखमी झालेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, December 21, 2013, 23:21