थर्टी फर्स्टसेलिब्रेशवर तिसऱ्या डोळ्याची नजर, cctv, party in Thane

थर्टी फर्स्टसेलिब्रेशवर तिसऱ्या डोळ्याची नजर

थर्टी फर्स्टसेलिब्रेशवर तिसऱ्या डोळ्याची नजर
www.24taas.com,ठाणे

थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करताना ठाणेकरांनो जरा जपून. सेलीब्रेशन करताना तुम्ही थोडसं जरी काही वाकडंतिकडं केलं तरी तुम्ही पकडले जाल. कारण पोलिसांसोबतच तिस-या डोळ्याची करडी नजर तुमच्यावर असणार आहे.

ठाणे पोलिसांनी प्रत्येक महत्वाचा ठिकाणी, तसंच हॉटेल ,रिसोर्टमध्ये cctv कॅमेरे बसवण्याचे निर्देश संबधितांना दिलेत. घोडबंदर रोड, तलावपाळी, कळवा नाका ,उपवन ,येऊर, स्टेशन परिसर या भागात पोलीस गस्त घालणार आहेत. त्यामुळे प्रत्येक नाक्यावर महिलांना पोलिसांची मदत मिळणार आहे.


पहिल्यांदाच अशा प्रकारचे सुरक्षेचे उपाय योजले जात आहेत. तळीराम, तसंच ओव्हर स्पीड बाईक चालवणारांनाही कठोर कारवाई केली जाणार आहे. दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे.

First Published: Monday, December 31, 2012, 08:26


comments powered by Disqus