Last Updated: Friday, January 4, 2013, 12:34
www.24taas.com, टिटवाळामध्य रेल्वेवर टिटवाळा आणि आंबिवली स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याचं पहाटे लक्षात आलं. यामुळे कसारा ते कल्याण दरम्यान अप मार्गावरची वाहतूक मंद गतीनं सुरू होती.
आठच्या सुमारास दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असलं तरी याचा परिणाम काही काळ राहण्याची शक्यता आहे. गेला आठवडाभर कोडमडलेल्या मध्य रेल्वेमागची साडेसाती अद्याप कायम आहे. लोकल गाड्यांची वाहतून १५ ते २० मिनिटं उशीरानं सुरू होती.
तर गेल्या दोन दिवसापूर्वी कळवा यार्डाचे काम सुरू होते त्यामुळे मध्य रेल्वे पूर्णपणे कोलमडली होती. यार्डाचं काम सुरु असल्यामुळं रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं.
First Published: Friday, January 4, 2013, 12:14