Last Updated: Wednesday, May 15, 2013, 09:20
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेठाणे शहरात काँग्रेसनं LBT बाबत गांधीगिरीचं दर्शन घडवलं. एलबीटीला विरोध दर्शवू नका, LBT हा प्रत्येकाच्या फायद्याचा आहे. व्यावसायिकांनी बंद पाळू नये.
LBT म्हणजे काय हे समजून घ्यावं असं आवाहन करत ठाण्यात काँग्रेसने गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलं. प्रत्येक दुकानांमध्ये जाऊन व्यावसायिकाला गुलाबाचे फुल दिले. त्यांना LBT बाबत माहिती देत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला.
काँग्रेसनं गांधीगिरीचा मार्ग पत्करला असताना दुसरीकडं मनसेने दोन दिवसात बंद मागे घेतला नाही तर आम्ही मनसे स्टाईलने दुकाने उघडू, असा इशारा दिला आहे. तर शिवसेना LBT च्या पूर्णपणे विरोधात आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 15, 2013, 09:19