Last Updated: Saturday, November 2, 2013, 10:34
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे राज्यात ठिकठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. दिवाळीतली ही संगीतमय सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला नागरिक उत्सुक असतात. ठाण्यातही गडकरी रंगायतनमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम पार पडला.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांची विराट सामाजिक, सांस्कृतिक मंच आणि रंगाई संस्थेच्या वतीनं हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. गेल्या १४ वर्षांपासून या संस्थेकडून दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात येतंय. छोट्या पडद्यावरील शशांक केतकर, तेजश्री प्रधान या कलाकारांसह गायक नचिकेत देसाई, केतन पटवर्धन, मानसी दातार, प्रिती निमकर-जोशी यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमांचं सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केलं.
ठाणे, डोंबिवलीत मराठी सण अगदी दणक्यात, मोठ्या उत्साहात साजरे होतात. गणेशोत्सव, दहीहंडी, गुढीपाडवा सारखे सण साजरे होताना इथं वेगळेपण जाणवतं. दिवाळीतही मोठा उत्साह पहायला मिळतो. सकाळी अनेकजण फिरण्यासाठी घराबाहेर पडताना दिसतात.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, November 2, 2013, 10:16