रत्नागिरीत वादळी वाऱ्याचा तडाखा, Cyclone in Ratnagiri

रत्नागिरीत वादळी वाऱ्याचा तडाखा

रत्नागिरीत वादळी वाऱ्याचा तडाखा
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात सावर्डे परिसराला वादळी वा-यांच्या जबर तडाखा बसलाय. अनेक भागात झाडं उन्मळून पडलेत. एका गाडीवर झाड पडल्यामुळे १ जण ठार तर पाच जखमी झालेत. मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक विस्कळीत झालीये.

चिपळूणजवळच्या सावर्डेला वादळी वा-याचा प्रचंड मोठा तडाखा बसलाय. या वादळात सावर्डे पोलीस स्टेशन समोरचं झाड एका धावत्या कारवर पडून चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी झालेत. हे प्रवासी मुंबईहून गणपतीपुळ्यात दर्शनासाठी जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला.

या वाऱ्यामुळे सावर्डे परिसरात अनेक घरं आणि दुकानांवरची छपरं उडून गेलीयत. या वादळामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळ बंद होती.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, November 4, 2013, 23:39


comments powered by Disqus