सावधान… ‘नानौक’ चक्रिवादळ येतंय!

Last Updated: Thursday, June 12, 2014, 17:16

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अरबी सागरात मुंबईहून दक्षिण-पश्चिम भागात जवळपास 660 किलोमीटर अंतरावर निम्न दाबानं ‘नानौक’ नावाचं चक्रिवादळ निर्माण व्हायला गती मिळालीय. हे चक्रिवादळ ओमानच्या तटाकडे पुढे सरकतंय.

लहेर चक्रीवादळाची शक्यता, आंध्र प्रदेश किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 10:53

लहेर चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. ऊद्या दुपारपर्यंत हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकेल अशी शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यसरकारने या नैसर्गीक आपत्तीचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे.

आंध्र प्रदेशला चक्रीवादळ, मुसळधार पावसाचा तडाखा

Last Updated: Friday, November 22, 2013, 16:34

आंध्र प्रदेशला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. हेलेन या चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला आहे. फायलिन वादळानंतर हेलेनने तडाखा दिला आहे. या वादळबरोबरच मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे.

सावर्डे गावाला वादळाचा तडाखा, अनेकांचे संसार उघड्यावर

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 19:01

मुंबई-गोवा महामार्गावरच्या सावर्डे गावाला ऐन दिवाळीत वादळाचा मोठा फटका बसला. सोमवारी संध्याकाळी आलेल्या वादळाने अनेक घरांवरची छपरे उडाली आणि संसार उघड्यावर प़डले. अवघी पाच मिनिटे घोंघावलेल्या या वादळात शेकडो झाडे मुळापासून उन्मळून घरांवर तसेच रस्त्यांवर पडली. त्यामुळे सावर्डे परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत आलेल्या या वादळामुळे प्रकाशाचा हा सण या गावक-यांसाठी अंधार घेऊन आलाय.

रत्नागिरीत वादळी वाऱ्याचा तडाखा

Last Updated: Monday, November 4, 2013, 23:39

रत्नागिरी जिल्ह्यात सावर्डे परिसराला वादळी वा-यांच्या जबर तडाखा बसलाय. अनेक भागात झाडं उन्मळून पडलेत. एका गाडीवर झाड पडल्यामुळे १ जण ठार तर पाच जखमी झालेत.

फायलीनचं संकट उंबरठ्यावर, तीन जणांचा मृत्यू

Last Updated: Saturday, October 12, 2013, 18:05

फायलीन चक्रीवादळ वेगाने भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. ‘फायलीन’ ओडिशामध्ये धडकण्यापूर्वीच वादळामुळे झाडं उन्मळून पडल्यानं तीन जणांचा मृत्यू झालाय.

फायलीन चक्रीवादळ : विमानसेवेवर परिणाम, मच्छिमारांना इशारा

Last Updated: Saturday, October 12, 2013, 15:08

फायलीन चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. काही उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

फायलीन चक्रीवादळाचा वेग वाढलाय

Last Updated: Saturday, October 12, 2013, 09:50

फायलीन चक्रीवादळाचं काउंटडाऊन सुरु झाले आहे. फायलिनचा वेग आणखी वाढला आहे. हे वादळ ओडिशाच्या भोपालपूरपासून ३४५ किमी दूर आहे. आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय.

कोकणातील उध्वस्त कुटुंबांचा आक्रोश

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 09:15

तीन वर्षांपूर्वी कोकणात झालेल्या फियान वादळाच्या आठवणी आजही कोकणात ताज्या आहेत. अनेकांचे बेपत्ता झालेले नातेवाईक आजही परतलेले नाहीत. ते परत येतील या एकाच आशेनं त्यांच्या पत्नी, मुलं वाटेकडे डोळे लावून बसलेत. शासनाच्या निकषामुळे ही कुटुंब मदतीपासून वंचित आहेत.

मध्य अमेरिकेवर वादळी संकट

Last Updated: Saturday, March 3, 2012, 16:18

मध्य अमेरिकेमध्ये लागोपाठ आलेल्या ७० हून जास्त चक्रीवादळांमुळे आत्तापर्यंत कमीत कमी १४ जणांचा मृत्यू झालेला आहे. एवढंच नव्हे तर मेरिसविल हे शहर पूर्णपणे उध्वस्त झाले. चक्रीवादळाने केवळ घरंच उध्वस्त केली नाहीत, तर शाळा आणि दुकानंही जमीनदोस्त झाली आहेत.

'थेन'चे ४० बळी, तमिळनाडूत मुसळधार

Last Updated: Saturday, December 31, 2011, 13:20

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या शक्तिशाली 'थेन' चक्रीवादळाने चांगलाच दणका दिला आहे. सततचा पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता बळींचा आकडा ४० वर पोहचला आहे.