रत्नागिरी पालिकेत अकार्यक्षम प्रशासन आणि राज्यकर, Dapingagrautammule nagarikanna environment in huff

रत्नागिरी पालिकेत अकार्यक्षम प्रशासन आणि राज्यकर्ते

रत्नागिरी पालिकेत अकार्यक्षम प्रशासन आणि राज्यकर्ते
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी

नगरपालिकेने शहराच्या विकासाचा गाडा हाकायचा....त्या नगरपालिकेसमोर डपिंगग्राऊटं असेल तर....आणि शहराला पाणिपुरवठा करणारं जल शुध्दीकरण केंद्र डपिंग्राऊंटजवळ असेल तर...नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-या रत्नागिरीतल्या नगरपालिकेतील प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेवर हा खास रिपोर्ट.

स्वच्छ आणि सुंदर रत्नागिरी करु पाहणा-या रत्नागिरी नगर पालिकेचे अस्वच्छ रुप समोर आलंय. शहराच्या मध्यवर्ती भागात पालिकेचं डंपिंग ग्राऊंड झालयं. शहारात दररोज जमा होणारा वीस टन कचरा या ठिकाणी आणला जातो.

गेल्या तेरा वर्षापासून हा कचरा या डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातोय. मात्र या डंपिग ग्राऊंडच्या चारही बाजूला वस्ती आहे. कच-याची दुर्गंधी, आणि कचरा जाळल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होतोय. नागरिकांच्या आरोग्याशी नगरपालिका प्रशासन आणि शासनकर्ते खेळत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 8, 2013, 14:56


comments powered by Disqus