डोंबिवलीत गॅसगळती, महिलेचा मृत्यू, Dombivali gas leakage, lady death

डोंबिवलीत गॅसगळती, महिलेचा मृत्यू

डोंबिवलीत गॅसगळती, महिलेचा मृत्यू
www.24taas.com, डोंबिवली

डोंबिवलीच्या सोनारपाडा परिसरात गॅसगळती झाली आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. गॅसगळतीमध्ये १ महिलेसह ४ ते ५ कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले आहेत.

डोंबिवलीत गॅसगळती झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र अजूनही गॅसगळीतचे कारण समजू शकलेले नाही. डोबिंवलीतील सोनारपाडा परिसरात फार मोठ्या प्रमाणात रसायनांच्या कंपन्या आहेत.

एखाद्या रसायनाच्या कंपनीतून विषारी वायू गळती झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अजूनही वायूगळती मागचं कारण कळू शकलेलं नाही.


First Published: Saturday, September 1, 2012, 12:06


comments powered by Disqus