आंतरजातीय विवाहाचा राग, सासरच्यांनी केलं सूनेचं मुंडणDue to Inter cast Marriage, Women Head shave

आंतरजातीय विवाहाचा राग, सासरच्यांनी केलं सूनेचं मुंडण

आंतरजातीय विवाहाचा राग, सासरच्यांनी केलं सूनेचं मुंडण
www.24taas.com, झी मीडिया, भिवंडी

घरच्यांचा विरोध असतानाही मुलानं आंतरजातीय विवाह केल्याच्या राग त्याच्या नातेवाईकांनी नववधूवर काढून तिचं मुंडण केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीमध्ये घडलाय. या प्रकरणी भिवंडीतल्या पडघा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलीय. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. दरम्यान, आता या प्रकरणी महिलेच्या सासरच्या तिघांना अटक करण्यात आलीय.

भिवंडी तालुक्यातल्या एका जोडप्याच्या झालेल्या छळवणुकीनं पुरोगामी महाराष्ट्र पुन्हा एकदा सुन्न झालाय. कुणबी समाजातल्या लग्नाला मुलाच्या घरच्यांचा विरोध होता. त्यांनी या जोडप्याला मारहाण तर केलीच पण अमानुष छळाची परिसिमा गाठत त्याच्या पत्नीचे कोयता आणि कात्रीने केस कापून मुंडण केलं.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली. मात्र श्रमजिवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केलीय

खाप पंचायत आणि जात पंचायतीच्या आदेशामुळं अनेक कुटुंबं उद्धवस्त झाल्याच्या घटना ताज्या आहेत. याच मालिकेतला आणखी एक प्रकार भिवंडीत घडलाय. हे प्रकार थांबवण्याची इच्छाशक्ती कधी निर्माण होणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 14, 2013, 21:14


comments powered by Disqus