Last Updated: Sunday, November 24, 2013, 22:40
www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात काँग्रेस आणि शिवसेनेने आयोजित केलेल्या आमने-सामने या कार्यक्रमात राडा झालाय.
या कार्यक्रमाला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले होते. यावेळी परिस्थिती तणावग्रस्त होणार हे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसंच जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांना अटक झाल्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली.
त्यानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे अनेक शिवसैनिक जखमी झालेत. कणकवलीतलं वातावरण यामुळे तणावग्रस्त बनलंय. अजूनही कार्यकर्ते गटा-गटाने येत असल्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनलंय.
व्हिडिओ पाहा - •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, November 24, 2013, 21:36