डहाणूत फुगा कंपनीला भीषण आग, fire in balloon factory in dahanu

डहाणूत फुगा कंपनीला भीषण आग

डहाणूत फुगा कंपनीला भीषण आग
www.24taas.com, झी मीडिया, डहाणू

डहाणू शहरातल्या फुगा फॅक्टरीला रात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली. `नॅशनल टॉय  प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड` नावाच्या या कंपनीत लागलेल्या भीषण आगीत सुदैवाने कोणतीही मनुष्य हानी झाली नसली तरी लाखोच सामान जळून खाक झालंय.

अग्निशमनदलाचे पाच बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झालेअसून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे  प्रयत्न सुरू आहेत. शॉक सर्कीटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त होतोय. विशेष म्हणजे तहसिलदार कार्यालयापासून ही कंपनी अवघ्या १०० मीटर अंतरावर असून ग्रीन झोन असलेल्या  डहाणू परीसरात शेकडो फुगा कंपन्या अनाधिकृतपणे  सुरू आहेत. यावर सेफ्टी विभाग आणि महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 30, 2014, 09:37


comments powered by Disqus