फटाक्यांच्या कंपनीला आग, नऊ जणांचा होरपळून मृत्यू, fire in fireworks company in alibaug

फटाक्यांच्या कंपनीला आग, नऊ जणांचा होरपळून मृत्यू

फटाक्यांच्या कंपनीला आग, नऊ जणांचा होरपळून मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, अलिबाग

अलिबागमध्ये एका फटाक्यांच्या कंपनीला भीषण आग लागल्याचं वृत्त नुकतंच हाती आलंय... या आगीत आत्तापर्यंत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समजतंय तर १९ जण जखमी आहेत.

क्रांती फायर वर्क्स असं या फटाक्यांच्या कंपनीचं आग आहे. कंपनीत असलेल्या फटाक्यांच्या दारुमुळे ही आग थोड्याच कालावधीत मोठ्या प्रमाणावर परसल्याचं समजतंय.


जखमींपैकी १० गंभीर जखमींना मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती अलिबागचे तहसीलदार विनोद खिरळकर यांनी दिलीय.

आग लागली त्यावेळी फटाक्यांच्या कारखान्यात ६० कामगार होते. मात्र, सुदैवानं इतर जण आगीपासून बचावले आहेत. कारखान्यात स्फोट झाला आणि ही आग लागली. कारखान्यातल्या दारूगोळ्यामुळं ही आग अधिकच भडकली.



व्हिडिओ पाहा-





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 27, 2014, 18:52


comments powered by Disqus