छेडछाडीच्या आरोपाखाली पहिली अटक , first arrest in obscene behaviour

छेडछाडीच्या आरोपाखाली पहिली अटक...

छेडछाडीच्या आरोपाखाली पहिली अटक...
www.24taas.com, भाईंदर

केंद्र सरकारनं नुकत्याच संमत केलेल्या छेडछाड प्रतिबंधक कायद्यानुसार पहिलीच अटक ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये झालीय. त्यामुळे एकप्रकारे पोलिसांनी नव्या कायद्याची अंमलबजावणी करत या कायद्याचा श्रीगणेशा केलाय.

भाईंदर पूर्व इथल्या आरएनपी पार्कमध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेशी मोबाईलवरुन अश्लील संभाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये अटक केलीय. विशाल वर्मा असे या युवकाचे नाव असून तो इंजिनियरिंगचा विद्यार्थी असून तो वाराणसीचा राहणारा आहे. या प्रकरणातली पीडित महिलाही वारणासीची असून ती विशालच्याच शेजारी राहत होती. विशालनं मागील महिन्यात पीडित महिलेशी अश्लील संभाषण केले होते. महिलेनं याबाबत तक्रार केल्यानंतर नवघर पोलीसांनी ही कारवाई केलीय.

विशालला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

First Published: Saturday, March 16, 2013, 17:05


comments powered by Disqus