मुरबाडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, पाचही जण ठार Five killed in chopper crash near Thane

मुरबाडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, पाचही जण ठार

मुरबाडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, पाचही जण ठार
www.24taas.com , झी मीडिया, मुरबाड

ठाणे ग्रामीण भागातील टोकवडे इथल्या नाणेघाट भागातील जंगलात एका हेलिकॉप्टरला अपघात झालाय. वीजेच्या तारेला धडकून या हेलिकॉप्टरला अपघात झालाय. मुंबईहून औरंगाबादकडे निघालेलं युनायटेड हॅचरीज कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं.

सकाळी सातच्या सुमारास विजेच्या उच्चदाबाच्या तारांमध्ये अडकून हेलिकॉप्टर कोसळलं. मुख्य रस्त्यापासून अपघाताचं ठिकाण चार ते पाच किलोमीटर आत जंगलात आहे. त्यामुळं अपघाताच्या ठिकाणापर्यंत पोहोचणं अडचणीचं होतंय. पोलीस घटनास्थळी पोहोचण्या़चा प्रयत्न करतायेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुहू हेलिकॉप्टर बेस इथून हे हेलिकॉप्टर औरंगाबादच्या दिशेनं निघालं होतं. सकाळी ७.४७ला हे हेलिकॉप्टर जुहू इथून निघालं होतं. ते ९.३० वाजता औरंगाबादला पोहोचणार होतं. पण हे हेलिकॉप्टर पोहोचलं नसल्यानं तपास केला असता या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचं समजलं.

दरम्यान, या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 29, 2013, 12:03


comments powered by Disqus