पाच वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार, five-year-old girl on sexual violence effort

पाच वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार

पाच वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

भाईंदर येथे चॉकलेटचे आमिष दाखवत आणि कबुतर दाखवण्याच्या बहाण्याने पाचवर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दक्ष कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे आरोपीच्या ताब्यातून तिची सुटका झाली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा प्रकार मीरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचार्‍याच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. भाईंदरमध्ये एका कॅटर्सकडे काम करणार्‍या आणि पालिकेच्या रात्रनिवारा केंद्रात राहणार्‍या वीरेन वोरा या संशयिताला भाईंदर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पिडीत मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून कबुतर दाखवण्याचा बहाना केला. वीरेन याने रात्रनिवारा केंद्राच्या अल्पवयीन मुलीला गच्चीवर नेले. तिथे वोरा या मुलीवर अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असतानाच महापालिकेचे कर्मचारी मनोहर म्हात्रे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी दक्षता दाखवून मुलीला वाचविले.

म्हात्रे यांनी मुलीला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी आपण पकडे जाऊ या भीतीने वोराने गच्चीला लागून असलेल्या झाडावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर कर्मचार्‍यांच्या मदतीने म्हात्रे यांनी त्याला पकडेल. त्यानंतर त्याला भाईंदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 4, 2014, 15:08


comments powered by Disqus