रायगडमधील किल्ल्यावर सप्ततारांकित स्थळ उभारण्याचा घाट , fort khanderi saptatarankit tourist spot in

रायगडमधील किल्ल्यावर सप्ततारांकित स्थळ उभारण्याचा घाट

रायगडमधील किल्ल्यावर सप्ततारांकित स्थळ उभारण्याचा घाट
www.24taas.com, झी मीडिया, अलिबाग

सागरी आरमाराची साक्ष देणा-या रायगड जिल्ह्यातील खंदेरी या किल्ल्यावर सप्ततारांकित पर्यटन स्थळ उभं करण्याचा घाट केंद्र सरकारने घातलाय. मात्र तसं झाल्यास रायगडमधला कोळी समाज बेघर होईल असं म्हणत कोळी समाजाने याला तीव्र विरोध केलाय.

अलिबाग जवळील ह्या खंदेरी किल्ल्याला मोठा इतिहास आहे आणि हा किल्ला जपण्याचं कामही इथले कोळी बांधव करतायत..याच भागात मासेमारी करुन ते आपला उदरनिर्वाह चालवतात.. येथे पर्यटन स्थळ झाल्यास त्यांच्या पोटावर पाय येईल आणि म्हणूनच कोळी समाजाकडून खंदेरीचं पर्यटन स्थळ करण्यास विरोध नोंदवला जातोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Wednesday, December 4, 2013, 22:00


comments powered by Disqus