सावधान! घर खरेदी-विक्रीमध्ये फसवणूकFraud in House purchase - sale in Thane

सावधान! घर खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक

सावधान! घर खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक
www.24taas.com , झी मीडिया, ठाणे

तेलही गेलं.. तुपही गेलं अशीच काहीशी अवस्था ठाण्यातल्या एका व्यावसायिकाची झालीय. तब्बल ७० लाखांचं त्याचं घर बनावट कागदी नोटांमध्ये विकलं गेलं.

शैलेंद्र सिंग यांना खारेगाव इथलं घर विकायचं होतं. त्यासाठी त्यांनी दिलेल्या जाहिरातीनुसार पदमसिंग राठोड आणि आदित्य सिंग मानोत हे ग्राहक मिळाले. परदेशातले असल्याचं सांगून या दोघांनी शैलेंद्र सिंग यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावलं. भेटीच्या वेळी ७० लाखाचं घर ८१ लाखांत घेण्याचं या बनावट ग्राहकांनी मान्य केलं. कायदेशीर व्यवहार पूर्ण झाल्यानंतर या ग्राहकांनी सिंग यांना पैशाची बॅग सोपवली.

बॅगेचा कोड देऊन दोघंही तिथून पसार झाले. बॅग उघडली असता सिंग यांच्या पायाखालची जणू जमिनच सरकली. बॅगेतल्या सर्व पैशांच्या नोटा खेळण्यातल्या नोटा पाहून त्यांचं धाबं दणाणलं. याबाबत सिंग यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी इस्टेट एजंट विरेन शहाला ताब्यात घेतलं. दरम्यान आरोपी पदमसिंग राठोड आणि आदित्य सिंग मानोत यांचा पोलीस शोध घेतायत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, November 5, 2013, 11:48


comments powered by Disqus