‘त्याचा’ अमानुष छळ, ‘ती’ फरार!Harrasment of Man by woman under black magic

काळ्याजादूच्या नावानं ‘त्याचा’ अमानुष छळ, ‘ती’ फरार!

काळ्याजादूच्या नावानं ‘त्याचा’ अमानुष छळ, ‘ती’ फरार!
www.24taas.com, झी मीडिया, वसई

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर राज्यसरकारकारनं अंधश्रद्धा विरोधी कायदा पास केला असतानाही वसईत काळ्याजादूच्या नावाखाली एका तरुणाचा अतोनात छळ करण्यात आलाय.

वसईतल्या निर्मळ परिसरात राहणाऱ्या जितेश सुरेष घोषे या तरुणावर जादूटोणा
करणा-या एका महिलेनं अमानुष अत्याचार केलेत. जितेशच्या अंगात वडलांचं भूत येतं ते उतरवण्याच्या नावाखाली या महिलेनं त्याच्या पाठीवर, पोटावर, छातीवर आणि खांद्यावर कापूर पेटवू चटके दिले. इतकंच नव्हे तर विळा गरम करून त्याच्या तोंडात कोंबला.

त्यामुळं सध्या या तरुणाला काहीच खाता येत नाही. सध्या तो केवळ लिक्विड फूडवरच जगतोय. एका घटनेनंतर घाबरलेल्या जितेशनं स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. मात्र शेजारच्या एका महिलेच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तीनं याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केलीय. दरम्यान जादूटोणा कणारी महिला फरार असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 12, 2013, 16:33


comments powered by Disqus